top of page
Add a heading (72).png
Copy of SP NCP New Presentation (36).png

मा. खा. सुप्रियाताई सुळे

भविष्याला सशक्त बनवणे, दूरदृष्टीने नेतृत्व करणे.

(राष्ट्रीय कार्याध्यक्ष)

awards-lead.png

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे, उज्वल भविष्य घडवण्यासाठी माझ्यासोबत या. आमच्याशी कनेक्ट व्हा आणि या परिवर्तनाच्या प्रवासाचा भाग व्हा.

  • Instagram
  • Facebook
  • X
  • Youtube

सुप्रिया सुळे : महाराष्ट्राच्या राजकारणातील गतिमान नेत्याचा प्रवास

महासंसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे
लोकसभा सदस्य
जिल्हा- पुणे
मतदारसंघ- बारामती लोकसभा
अनुभव- २० वर्ष
विजयी कारकीर्द- ४


पुरोगामी विचारांचा आदर्श मानून खा. सुप्रियाताई सुळे या सामाजिक न्यायाला कायम प्राधान्य देणा-या आहेत. समानतेचा वसा जोपासून जनतेला समस्यामुक्त करण्याचा दृष्टीकोन खा. सुप्रियाताई सुळे बाळगून आहेत. स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलेल्या ८०% समाजकारण आणि २०% राजकारण या मार्गावर त्या चालणा-या आहेत.


खा. सुप्रियाताई सुळे या २००६ मध्ये पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून आल्या होत्या, त्यानंतर २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये सलग तीन वेळा लोकसभेच्या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. संसदेतील लोकप्रतिनिधी या नात्याने, त्या प्रत्येक सामान्य नागरिकाच्या विशेषत: मध्यमवर्गीय, महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी इत्यादींच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर आवाज उठवतात.


संसदेत केलेल्या त्यांच्या सर्वसमावेशक भाषणांसाठी त्या ओळखल्या जातात. कारण कुठलंही भाषण हे त्या अभ्यासूपध्दतीने अत्यंत रिसर्च करून तथ्यांव्दारे करत असतात. त्यांचे मुद्दे हे नेमही आकडेवारीवर आधारित असतात. त्या एक अशा नेत्या आहेत ज्या स्वतःला अपग्रेड ठेवत असतात आणि संसदेतील सभागृहात सामान्य नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी त्या कायम कटिबध्द आहेत. त्यांच्या उत्कृष्ट संसदीय कामगिरीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांद्वारे अनेक वेळा गौरविण्यात आले आहे.


एकुलती एक मुलगी असलेल्या कुटुंबात वाढून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. प्रत्येक नात्याची त्या कदर करतात. ग्लॅमरपेक्षा साधे जीवन जगायला त्यांना आवडते. खा. सुप्रियाताई सुळे या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम अग्रेसर असतात. नेहमीच मतदारसंघात, महाराष्ट्रात आणि भारतभर त्या प्रवास करत असतात. सामाजिक-राजकीय स्वारस्यांव्यतिरिक्त, त्यांना कलेची देखील तितकीच आवड आहे. यशासाठी कोणताही शॉर्टकट नाही आणि कठोर परिश्रमांना पर्याय नाही हेच खा. सुप्रियाताई सुळे यांचं ब्रीदवाक्य आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार यांची ताकद पक्षाचे कार्यकर्ते आहेत, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हाती घेतलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आणि पाठपुरावा करण्यासाठी अनेकदा बैठका घेतल्या जातात.

महासंसदरत्न मा. खा. सुप्रियाताई सुळे  यांची विशेष उल्लेखनीय कामगिरी:


लोकप्रतिनिधी म्हणून, स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय महत्त्व असलेल्या सामान्य नागरिकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या मुद्द्यांवर त्या आवाज उठवतात. २०११ मध्ये, त्यांनी कन्या भ्रूण हत्येच्या विरोधात राज्यव्यापी मोहीम सुरू केली. ज्यात पदयात्रा, महाविद्यालयीन कार्यक्रम, स्पर्धा इत्यादींचा समावेश होता. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थान असलेल्या नायगाव येथे याचे उद्घाटन झाले आणि पुण्यातील कोरेगाव येथे समारोप झाला. अनेक तरुण स्त्रिया आणि पुरुषांच्या सहभागामुळे महाराष्ट्र राज्यात कन्या भ्रूण हत्येच्या वाढत्या घटना आणि लिंग गुणोत्तर झपाट्याने कमी होत असल्याबद्दल मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण झाली. 
कुपोषणाच्या विरोधात सुरु असलेल्या मोहिमेतही खा. सुप्रिया सुळे या अग्रस्थानी होती. 
२०१३ मध्ये, त्यांनी तरुण मुलींना राजकारणात व्यासपीठ देण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्यात त्यांना एकत्रित आणण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसची सुरुवात केली.

 

खा. सुप्रियाताई सुळे यांना मिळालेले विविध पुरस्कार:

  • संसद महारत्न पुरस्कार (सलग दोन वर्ष)

  • संसद विशिष्टरत्न पुरस्कार संसदरत्न पुरस्कार (सलग आठ वर्षे)

  • युनिसेफ पार्लमेंट्री अॅवार्ड फाॅर चिल्ड्रन २०१८

  • उत्कृष्ट महिला संसदपटू पुरस्कार २०१९ (लोकमत ग्रुप)

  • नारीशक्ती उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार

  • (‘फेम इंडिया’च्या वतीने देण्यात येणारा पुरस्कार सलग तीन वर्षे प्राप्त)

  • द सोफी इंडियन अॅवार्ड | देवी पुरस्कार | भारत अस्मिता अॅवार्ड

 

राजकीय प्रवास

  • २००६- महाराष्ट्रातून राज्यसभेवर बिनविरोध निवड व राजकीय वाटचालीस सुरुवात.

  • २०१८- लोकसभेत पक्षाच्या गटनेत्या म्हणून निवड

  • २०१९- लोकसभेत पक्षाच्या गटनेत्या म्हणून फेरनिवड

  • २०२३- १० जून २०२३ रोजी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदी निवड


 

लोकसभा सदस्य

  • २००९- बारामती लोकसभा मतदारसंघातून प्रचंड बहुमतांनी विजयी (१५ वी लोकसभा)

  • २०१४- बारामती लोकसभा मतदारसंघातून दुस-यांदा निवड (१६ वी लोकसभा)

  • २०१९- बारामती लोकसभा मतदारसंघातून सलग तिस-यांदा निवड (१७ वी लोकसभा)
     

  • कार्यालयीन पत्ता व संपर्क क्रमांक 

       पुणे- (०२०) २४२६३२६६, २४२६४२५३

       मुंबई- (०२२) २३५१५६०५, २३५१९६५८

दिल्ली- (०११) २३०१८८७०, २३०१८६१९

ईमेल- supriyasule@gmail.com

9ef403043cbdca62f47a10a692a9d7a1.png

राजकीय प्रवास

Supriya Sule entered into electoral politics when she was first elected unopposed to Rajya Sabha from Maharashtra in 2006. Later in 2009, 2014 & 2019, she was elected as a Member of Parliament in Lok Sabha from Baramati Lok Sabha constituency.

As a people’s representative, she is vocal about issues that matter to common citizens, having local, state and national importance. In 2011, she launched a State-wide campaign against female foeticide that involved Padayatra, college events, competitions etc. It was inaugurated at Naigaon-the birthplace of Krantijyoti Savitribai Phule and concluded in Koregaon in Pune. The participation of many young women and men led to large scale awareness regarding rising incidents of female infanticide and a rapidly falling sex ratio in the state of Maharashtra. Supriya Sule has also been associated with an all-party campaign against malnutrition. In 2012, she launched the Rashtravadi Yuvati Congress to give a platform to young girls in politics and create their network across the state of Maharashtra.

राज्यसभा, महाराष्ट्र

2006 मध्ये महाराष्ट्रातून पहिल्यांदा राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले.

2006

2009 

15वी लोकसभा

2009 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले.

16 वी लोकसभा

2014 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून आले.

2014 

2019

17 वी लोकसभा

2019 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून आले

कार्याध्यक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

From 10th June 2023 

2024

18 वी लोकसभा

2024 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा लोकसभेवर निवडून आले.

Blurry Blue

यश आणि पुरस्कार

सुप्रिया सुळे समाजाच्या भल्यासाठी तत्परतेने काम करतात. त्या देशातील टॉप परफॉर्मर्सपैकी एक आहेत. त्यांचे या प्रयत्नांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे

Sansad Vishisht Ratna Award 2022 for sustained outstanding performance in the 17th Lok Sabha

Sansad Maha Ratna 2021 for sustained qualitative performance in the 16th Lok Sabha.

Sansad Ratna Award for seven consecutive years.

UNICEF Parliamentary Award for Children 2018

Best Woman Parliamentarian of the Year Award 2019 by Lokmat Group.

Shreshth Saansad Award 2019 by Fame India for three consecutive years

‘Devi Award' by The New Indian Express for 'Empowerment through Education'.

‘Bharat Asmita Award’ by MIT World Peace University, Pune.

Mumbai Women of the Decade Achievers Award for Excellence in Social Service 2014 by All Ladies League (ALL)

The Sophie Indian Award

ताई, आपली हक्काची !

bottom of page