आ. खा. श्री. शरदचंद्र पवार साहेब
(राष्ट्रीय अध्यक्ष)
समुदाय मजबूत करणे,
प्रगतीशील भविष्यासाठी मार्गदर्शन करणे
शरदचंद्र गोविंदराव पवार: भारताचे भविष्य आणि महाराष्ट्राच्या राजकीय परिदृश्याला आकार देणारा दूरदर्शी नेता !
महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज व भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रमाण मानून महाराष्ट्रात पुरोगामी विचारांची मुर्हूतमेढ १० जून १९९९ रोजी रोवली गेली. आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी उज्ज्वल महाराष्ट्राच्या भविष्यासाठी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची स्थापना केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेली २४ वर्ष अविरतपणे दैदीप्यमान कामगिरी बजावत आहे. सेवा-सन्मान-स्वाभिमान हे ब्रीद अंगीकारून पुरोगामी विचारधारा जपत आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकरी-कष्टकरी-महिला-युवक या सगळ्यांचा सर्वांगीण विकास करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बांधील राहत आलेला आहे. विकास असो की संकट या प्रत्येक परिस्थितीत महाराष्ट्राचे सह्याद्री अर्थात पवार साहेब कायम कटिबध्द राहिलेले आहेत.
सर्वसामान्य, गोरगरीब, रंजल्यागांजल्यांचा सर्वांगीण विकास हा एकच ध्यास बाळगून अहोरात्र कार्यरत राहणा-या आदरणीय शरद पवार साहेबांसोबत एकनिष्ठा राहून सदैव राष्ट्रवादी स्वाभिमान जपूयात! साथ अनुभवाची, ताकद महाराष्ट्राची आणि सोबत आधारवड सह्याद्रीची!
Political Journey
State President of the Maharashtra NCP- SP
Serving as the State President of the Maharashtra NCP-SP since April 2018.
April 2018
1990, 1995, 1999, 2004, 2009
Member of Legislative Assembly
Elected as a Member of the Legislative Assembly in the years 1990, 1995, 1999, 2004, and 2009.
Finance Minister, Maharashtra
Served as the Finance Minister of Maharashtra from 1999 to 2008.
1999 - 2008
2008 - 2009
Home Minister
Held the position of Home Minister in Maharashtra from 2008 to 2009.
Rural Development Minister
Served as the Rural Development Minister in Maharashtra from 2009 to 2014.
2009 - 2014
2019
Water Resources Minister in coalition government
Assumed the role of Water Resources Minister in the Uddhav Thackeray-led coalition government in 2019.
राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार साहेबांची उल्लेखनीय कारकीर्द:
जन्म: १२ डिसेंबर १९४० काटेवाडी, बारामती येथे जन्म
शिक्षणः राजर्षी शाहू विद्यालय, बारामती
१९६२: महाविद्यालयीन शिक्षण, बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे
१९६२ः युवक काँग्रेसमध्ये प्रवेश
१९६३: प. महाराष्ट्र युवक काँग्रेस चिटणीस
१९६४: महाराष्ट्र युवक काँग्रेस चिटणीस
१९६७: बारामती मतदारसंघातून विधानसभेवर निवड
१९७२: राज्यमंत्री (गृह क्रीडा, राजशिष्टाचार, अन्न व नागरी पुरवठा)
१९७४: कॅबिनेट मंत्री (शिक्षण व युवक कल्याण)
१९७७: वसंतदादा पाटील मंत्रिमंडळात मंत्री (गृह व यवक सेवा खाते)
१९७८: पुरोगामी लोकशाही दलाची स्थापना
१९७८: वयाच्या ३८व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
१९८०: अखिल भारतीय काँग्रेसची (समाजवादी) स्थापना
१९८४: बारामती मतदारसंघातून लोकसभा खासदार
१९८५: पुन्हा विधानसभेवर निवड
१९८८-९०: दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
१९९०-९१: तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
१९९१: बारामतीतून दुसऱ्यांदा लोकसभेवर निवड
१९९१-९३: देशाचे संरक्षणमंत्री
१९९१: संरक्षणमंत्री असताना महिलांना तिन्ही सैन्यदलात प्रवेश देण्याचा निर्णय
१९९३: मुंबई बॉम्बस्फोटानंतर अस्थिर झालेल्या महाराष्ट्राला सावरण्यासाठी पुन्हा राज्यात आले.
१९९३: किल्लारी भूकंपानंतर यशस्वीपणे परिस्थिती पूर्वपदावर आणली
१९९३: राज्यात महिलांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण (२०११-५०%)
१९९५: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते
१९९६: बारामतीतून तिसऱ्यांदा लोकसभेवर निवड
१९९७: लोकसभेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड
१९९८: बारामतीतून चौथ्यांदा लोकसभेवर निवड, विरोधी पक्षनेतेपद
१० जून १९९९: राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना
२००१: गुजरात भूकंपावेळी 'एनडीए'च्या काळात
आपत्कालीन व्यवस्थापन समितीची जबाबदारी
२००४: बारामती मतदारसंघातून पाचव्यांदा लोकसभेवर निवड
२००४-१४: केंद्रात कृषिमंत्री पदाची जबाबदारी
२००५: बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून निवड
२००९: माढा मतदारसंघातून पुन्हालोकसभेवर निवड
२०१०: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष
२०११: भारतात क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे यशस्वी आयोजन
२०१४: राज्यसभेवर नियुक्ती
२०१५: वयाची पंचाहत्तरी पूर्ण, 'लोक माझे सांगाती' आत्मचरित्र प्रकाशित
२०१७: 'पद्मविभूषण'ने सन्मानित
२०१९: राष्ट्रवादी-शिवसेना-काँग्रेस महाविकास आघाडीचे शिल्पकार
राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार साहेबांची वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी:
1. मुंबई समुद्र परिसरात नैसर्गिक तेलाचे साठे आढळले. त्यावर आधारित उद्योग महाराष्ट्रात सुरु कऱण्यात पवार साहेबांचे मोठं योगदान आहे.
2. राज्यातील भटक्या विमुक्तांना घरे बांधण्यासाठी पुण्यात १४० एकर जमीन मंजूर केली.
3. शिकत शिकत काम करणा-यांसाठी नाशिक येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना केली.
4. हिंजवडी आयटी पार्क उभारून राष्ट्रीय कंपन्यांसोबतच अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांना व्यवसाय विस्ताराची संधी दिली. यामुळे फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचा कायापालट होण्यास हातभार लाभला.
5. राज्यात फलोत्पादन कार्यक्रम पवार साहेबांनी राबवला. हा कार्यक्रम इतका यशस्वी ठरला की जो केंद्र सरकारनेही राबवला.
6. बिजिंगमधील एशियाड स्पर्धेत कबड्डीचा समावेश झाला तो शरद पवार साहेबांच्या प्रयत्नामुळेच.
7. पुण्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं. त्यावेळी अवघ्या ११ महिन्यात अहोरात्र काम करून शिवछत्रपती क्रीडा नगरीची उभारणी केली.
8. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण दिलं.
9. मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आलं.
10. महाराष्ट्रासाठी ३ वैधानिक विकास महामंडळाची स्थापना शरद पवार साहेबांनी केली.
11. प्राथमिक आरोग्य केंद्रातील मदतनिसांना पवार साहेबांनी वेतनवाढ केली. त्यानंतर अद्याप कधीच ही वेतनवाढ झाली नाही. केवळ घोषणा झाल्या.
12. शांघायच्या धर्तीवर मुंबईत वांद्रे कुर्ली काॅम्प्लेक्स (BKC) सी निर्माण केलं. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यालयांना बीकेसीत आमंत्रित करून अनेक रोजगार उभारले. राज्यासाठी घसघशीत महसूलाचा स्त्रोत सुरु केला.
13. कोकण रेल्वेसाठी निधीच आवश्यकता होती. त्यावेळी केरळने निधी दिला नव्हता. पवार साहेबांनी पुढाकार घेत महाराष्ट्राकडून कोकण रेल्वेसाठी निधी पुरवण्यात आला.
14. कष्टक-या माथाडी कामगारांसाठी नवी मुंबई येथील कोपर खैरणेत सिडकोकडून ५ हजार घरं बाधून ती माथाडी कामगारांना देण्यात पवार साहेबांचं मोठं योगदान आहे.
15. अर्थसंकल्पात आदिवासींसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद करण्याचा निर्णय पवार साहेबां घेतला. हाच निर्णय केंद्राकडूनही राबवण्यात आला.
16. मनरेगा या केंद्रशासित योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती करण्यात
आली.
17. मुस्लिम समाजाच्या आर्थिक विकासाठी सच्चर आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाच्या शिफारशीनुसार अंमलबजावणी करून मुस्लिम बांधवांना राष्ट्रीय विकासप्रक्रियेत सामील करून घेण्यासाठी प्रयत्न केले.
18. केंद्र सरकारमार्फत विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येणारा निधी थेट ग्रामपंचायतीच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आला.
19. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान उपक्रमाची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात आली.
20. यशवंत ग्रामसमृद्धी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राला सर्वांगीण विकासासाठी आर्थिक बाळ दिले.
21. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राज्यातील प्रशासनाला शिक्षण, आरोग्य व विकासकामांसाठी गतिमान केले.
22. सिंचन क्षेत्रामध्ये भीमा-कृष्णा सिंचन योजनेस मंजुरी देऊन त्यासाठी तरतूद करून योजनेची अंमलबजावणी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी भरीव निधी देण्याची व्यवस्था करण्यात आली.
23. राज्यातील रस्ते वाहतूक रुंदीकरण व मजबुतीकरण करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. एकूण १९९९ ते २०१५ या १५ वर्षांच्या कालावधीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय पक्षाने सामान्य माणसांच्या विकासाठी घेतले.
24. आयसीएआरने ‘‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन बायोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट (बारामती), ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बायोटिक स्ट्रेस’ (रायपूर) आणि ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी’ (रांची) या अभिमत विद्यापीठ दर्जाच्या तीन नव्या संस्था सुरू केल्या आहेत.
25. आदरणीय पवार साहेबांनी हिंजवडी, चाकण, तळेगाव, रांजणगाव, शिरवळ, कुरकुंभ, खंडाळा यासारख्या महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मोठे एमआयडीसी प्रकल्प उभारून महाष्ट्राची उद्योगविश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली. पुढे एमआयडीसीचा विस्तार झाला आणि आणि आजमितीला 289 एमआयडीसी संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहेत. टाॅपच्या वाहन उद्योग क्षेत्रासह टेक्सटाईल, फूड प्रोसेसींग अशा नामांकित कंपन्यांचे कारखाने या ठिकाणी आहेत. यामुळे केवळ रोजगाराचाच प्रश्न सुटला नाही तर त्या त्या शहरांचाही मोठ्या प्रमाणावर विकास होऊन स्थानिकांचे जीवनमान सुधारले गेले.
26. हिंजवडी आयटी पार्कच्या माध्यमातून देशभरातील लाखो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.
27. आदरणीय साहेबांनी नवी मुंबईसारखं नियोजनबध्द आंतरराष्ट्रीय शहर साकारलं.
28. १९९३ साली किल्लारी भूकंपाच्या वेळेस घटनास्थळी तळ ठोकून पवार साहेबांनी भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनाचं काम तातडीने हाती घेतलं. आणि संकटाच्या काळात आपत्ती निवारण करण्याचा विशेष आदर्श संपूर्ण जगाला घालून दिला.
29. देशाच्या संरक्षण मंत्री पदी असताना आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तीनही ठिकाणी ११ टक्के जागा महिलांना राखीव ठेवण्याचा ऐतिहासीक निर्णय घेतला.
30. सैन्यदलात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून देशसेवा करण्याची संधी तसेच अधिकारी होण्याची संधी महिलांना मिळाली.
31. १९९३ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना आदरणीय पवार साहेबांनी राज्य महिला आयोगाची स्थापना केली. स्वतंत्र महिला आयोगाची स्थापना करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं.
32. देश संकटात असताना बळीराजा हाच देशातील स्थिती पूर्वपदावार आणू शकतो हे आदरणीय खा. शरद पवार साहेबांनी ओळखलं आणि अशा परिस्थितीत केंद्रीय कृषि खातं स्वतःकडे मागून घेतलं.
33. आदरणीय पवार साहेबांनी देशाच्या इतिहासातील ७१ हजार कोटींची सर्वात मोठी कर्जमाफी करून देशातील ४ कोटी ३० लाख शेतक-यांचा सातबारा कोरा केला आणि
शेतक-यांना उत्पन्नाच्या मूळ प्रवाहात आणलं.
34. शेतमालाच्या आधारभूत किंमती चौपटीने वाढवून दिल्या. त्यामुळे अन्नधान्याचे उत्पादन ५० दशलक्ष टनाने वाढले. आदरणीय पवार साहेबांच्या दूरदृष्टीमुळे दुसरी हरितक्रांती यशस्वी झाली.
35. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा शेतीच्या प्रश्नांसाठी राष्ट्रीय विकास परिषदेची बैठक घेतली. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी प्रत्येक राज्याला हजारो कोटींचे भागभांडवल आदरणीय पवार साहेबांनी दिले.
36. सिंचन वर्धित विकास कार्यक्रमांतर्गत (AIBP) धरणांची कामे पूर्ण करण्यासाठी केंद्रातून दरवर्षी हजारो कोटींचे सहाय्य मिळाले ते आदरणीय पवार साहेबांमुळेच.
37. विदर्भातील गोसीखुर्द प्रकल्पाला राष्ट्रीय मान्यता मिळवून देऊन ९० टक्के अर्थसहाय्य आदरणीय पवार साहेबांमुळे केंद्रातून देण्यात आले
38. आदरणीय पवार साहेबांनी नॅशनल हॉर्टिकल्चरल मिशनमधून फळबाग लागवडीचा कार्यक्रम देशभर राबविला तसेच ठिबक सिंचन योजनेला केंद्रातून मोठया प्रमाणात अनुदान देण्यात येऊ लागले.
39. मेगा पाणलोटचा कार्यक्रम देशभर राबवून पाणलोट विकास कार्यक्रमाला त्यांनी गती दिली.
40. फूड प्रक्रिया उद्योगासाठी नवी योजना आखून प्रत्येक जिल्ह्यात एक मोठा प्रकल्प त्यांनी उभा केला व प्रक्रिया कारखानदारी विकसीत केली.
40. फूड प्रक्रिया उद्योगासाठी नवी योजना आखून प्रत्येक जिल्ह्यात एक मोठा प्रकल्प त्यांनी उभा केला व प्रक्रिया कारखानदारी विकसीत केली.
41. देशाला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण करून २५ देशांना धान्य निर्यात करून त्यांची अन्नाची भूक भागविली.
42. देशाच्या अन्नधान्य स्वयंपूर्णतेइतकेच महत्त्व शेतक-याच्या आर्थिक उन्नतीला देऊन लाखो कोटी रुपये आधारभूत किंमतीतून शेतक-याच्या घरात जास्तीचे पाठवण्याचे कार्य आदरणीय पवार साहेबांनी केले.
43. २००४ ते २०१४ या काळात गव्हाच्या आधारभूत किंमतीत १२२ टक्क्यांनी वाढ केली, सोयाबीनच्या आधारभूत किंमतीत ११८ टक्क्यांनी वाढ केली, हरभराच्या आधारभूत किंमतीत १२१ टक्के वाढ केली, गहू उत्पादनात वाढ होऊन गव्हाची निर्यात होऊ लागली आणि संपूर्ण जगाची अन्नाची गरज पवार साहेबांनी भागवली.
44. ज्येष्ठ बंधू अप्पासाहेब पवार यांच्या नेतृत्त्वाखाली 1971 साली बारामती कृषि प्रतिष्ठानची स्थापना केली. पथदर्शी प्रयोग राबवले.
45. ‘घर तेथे संकरित गाय’, ‘गाव तेथे सहकारी दूध सोसायटी’ या सूत्राने राज्यभरात दूग्ध व्यवसाय वृद्धींगत केला.
46. सहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या मराठी कलाकारांना राज्याकडून 1 लाख रुपये देण्याचा निर्णय शरद पवार साहेबांनी घेतला.
47. पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना कोकण रेल्वेसाठी केरळने निधी देण्यात असमर्थता दर्शवल्यानंतर महाराष्ट्राने ती जबाबदारी घेतली.