मा. आ. राजेश टोपे
समुदायांना सक्षम करणे,
उद्देशाने अग्रगण्य
तुमच्यासोबत उभे राहणे हा एक मोठा विशेषाधिकार आहे कारण आम्ही उद्याच्या उज्ज्वलासाठी प्रयत्न करत आहोत. एकत्रितपणे, आम्ही दृढनिश्चय, करुणा आणि लवचिकतेने पुढे जाऊ. माझ्याशी असे भविष्य घडवण्यात सामील व्हा जिथे आशेला सीमा नसते.
राजेश टोपे: महाराष्ट्राच्या राजकीय परिदृश्यातील एका दूरदर्शी नेत्याचा उल्लेखनीय प्रवास
श्री. राजेश टोपे
विधानसभा सदस्य.
जिल्हा- जालना
मतदारसंघ- घनसावंगी
अनुभव- ३० वर्ष
विजयी कारकीर्द- ५
जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघाचे आमदार श्री. राजेश भैय्या टोपे हे माजी खासदार कर्मयोगी स्व. अंकुशराव टोपे यांचे चिरंजीव आहेत. श्री. राजेश टोपेंना राजकारणाचा वारसा त्यांच्या घरातूनच मिळाला. स्व. अंकुशराव टोपे हे आ. खा. शरद पवार साहेबांच्या जवळचे समजले जायचे. जालना जिल्ह्यामध्ये सहकारी संस्थांचा विकास करण्यातही अंकुशराव टोपे यांचा महत्त्वाचा वाटा होता. श्री. राजेश भैय्या टोपे हे त्यांच्या वारसा समर्थपणे चालवत आहेत.
श्री. राजेश भैय्या टोपे यांनी १९९९ पासून त्यांनी सलग पाचवेळा विजय प्राप्त केला. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये सार्वजनिक आरोग्य मंत्री या भूमिकेतून कोविडचे आव्हान पेलून त्यांनी महाराष्ट्रातील लोकांची मने जिंकली. सामान्य प्रशासन राज्यमंत्री, ऊर्जा खात्याची जबाबदारी, उच्च शिक्षण खाते ते आज सार्वजनिक आरोग्य अशा विविध खात्याची कामगिरी त्यांनी उत्तमरीत्या पार पाडली.
इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या टोपे यांनी वयाच्या २३ व्या वर्षी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राजकारणात प्रवेश केला. त्यांनी १९९६ साली लोकसभेची निवडणूकही लढवली. मात्र या पहिल्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. १९९९ मध्ये शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी राजेश टोपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक लढवली. अंबड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून ते आमदार झाले आणि त्यांनी राज्यमंत्रिपदाची शपथही घेतली होती. मार्च २००१ मध्ये पुन्हा त्यांची राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली आणि त्यानंतर सलगच १४ वर्षे ते मंत्रिपदावर राहिले.
२००४ साली ते पुन्हा अंबड मतदारसंघातून निवडून आले. त्यांनी नगरविकास, जलसंधारण, संसदीय कार्य, सामान्य प्रशासन या खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं.
२००९ साली राजेश टोपेंनी घनसावंगीमधून निवडणूक लढवली. कारण अंबड विधानसभा मतदारसंघ बदनापूरमध्ये विलीन झाला होता आणि घनसावंगी मतदारसंघाची निर्मिती झाली होती. त्यावेळी त्यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता.
राजेश टोपेंचे वडील अंकुशराव टोपे यांनी जालना जिल्ह्यात सहकारी संस्थांचं जाळं उभं केलं होतं. वडिलांनी उभारलेल्या अनेक संस्थांच्या प्रमुखपदांची जबाबदारी त्यांच्या हयातीतच राजेश टोपे यांच्याकडे आली. अंकुशनगर इथला सहकारी साखर कारखाना, शिक्षण संस्था, सहकारी सूतगिरणी, अभियांत्रिकी महाविद्यालय अशा संस्थात्मक कामांची जबाबदारी राजेश टोपेंनी सांभाळली. या संस्थांच्या माध्यातून राजेश टोपेंनी जिल्हा आणि त्यांचा मतदारसंघ घनसावंगीमध्ये चांगला जनसंपर्क जपला आहे. त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची जनसामान्यांमधील प्रतिमा चांगली आहे.
विधानसभा सदस्य:
१९९९
२००४
२००९
२०१४
२०१९
मंत्रिमंडळातील पद व कार्यकाळ:
-
१९९९-२०१४- राज्यमंत्री
-
२००४- नगरविकास, जलसंधारण, संसदीय कार्य, सामान्य प्रशासन राज्यमंत्री
-
२०१९- सार्वजनिक आरोग्य व कुुटुंब कल्याण मंत्री
श्री. राजेश टोपे यांची विशेष उल्लेखनीय कामगिरी:
-
आरोग्यमंत्री असताना कोरोना महामारीत काही रुग्णालयांच्या नफेखोरीला त्यांनी आळा घातला. औषधांच्या किमती आटोक्यात ठेवल्या, चाचण्या स्वस्तात उपलब्ध करून दिल्या.
-
आघाडीच्या आधीच्या काळात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला. सामान्य प्रशासन राज्यमंत्री, ऊर्जा खात्याची जबाबदारी, उच्च शिक्षण खाते ते आज सार्वजनिक आरोग्य अशा विविध खात्यांची कामगिरी त्यांनी उत्तमरीत्या पार पाडली.
-
राजेश टोपे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री असताना नवीन विद्यापीठ कायदा संमत झाला होता. या कायद्यामुळे कुलगुरूंची स्वायत्तता कमी करण्यात आली होती. या निर्णयावर त्यावेळी खूप टीकाही झाली होती.
-
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील १०० टक्के जनतेला मोफत आरोग्य उपचार देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय तत्कालीन आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांनी घेतला. राज्यातील नागरिकांना मोफत व कॅशलेस विमा संरक्षण देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य.
कार्यालयीन पत्ता व संपर्क क्रमांक
1) अजिंक्य, भाग्य नगर, जालना, महाराष्ट्र, भारत
Email: saheb@rajeshtope.com
2) घनसावंगी (NCP कार्यालय), जालना, महाराष्ट्र, भारत
Email: saheb@rajeshtope.com
मा. श्री. जयंत राजाराम पाटील
विधानसभा सदस्य.
प्रदेशाध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार
जिल्हा- सांगली
मतदारसंघ- इस्लामपूर
अनुभव- ३२ वर्ष
विजयी कारकीर्द- ७
इस्लामपूर तालुक्यातील साखराळे हे जयंत पाटील यांचे गाव. त्यांचा जन्म १६ फेब्रुवारी १९६२ रोजी झाला. स्वर्गीय राजारामबापू पाटील यांचे चिरंजीव असलेल्या जयंत पाटील यांना घरातूनच राजकारणाचं बाळकडू मिळालं. राजारामबापू काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. वडिलांकडूनच राजकारणाचे धडे त्यांना मिळाले. सलग ९ वेळा अर्थसंकल्प मांडणारे मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री म्हणून जयंत पाटील यांनी कामगिरी बजावली आहे. पाटील यांनी राज्याच्या मंत्रीमंडळात सलग पंधरा वर्षे अर्थ, गृह व ग्रामविकासमंत्री म्हणून प्रभावी काम करतानाच लोकांचे विविध प्रश्न सोडविण्यास मोठे सहकार्य केले.
श्री. जयंत पाटील यांची ओळख ही राजकीय क्षेत्रातील सुविद्य व सुसंस्कृत व्यक्तिमत्व अशी आहे. अत्यंत तळगाळातील परिस्थितीची जाम ठेवून त्यादृष्टीकोनातून अथकपणे काम करणारे नेतृत्व म्हणून त्यांचा लौकिक आहे. महाराष्ट्राच्या अर्थकारणाचे व समाजकारणाचे बारकावे जाणणारे अभ्यासू नेते म्हणून ते परिचित आहेत. सहकार महर्षी राजारामबापू पाटील यांचा समाजकारण व राजकारणाचा वारसा पुढे चालवत अतिशय यशस्वीपणे सहकारी साखर कारखाना, दूध संघ, शिक्षण संस्था, टेक्सटाईल पार्क यांची उभारणी श्री. जयंच पाटील यांच्यामार्फत करण्यात आली. सलग सात वेळा वाळवा मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी झाले आहेत. आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर सलग नऊवेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याचा इतिहास श्री. जयंत पाटील यांच्या नावावर लिहिला गेला आहे. श्री. जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा उत्तमरीत्या सांभाळत आहेत.
विधानसभा सदस्य-
१९९०
१९९५
१९९९
२००४
२००९
२०१४
२०१९
मंत्रिमंडळातील पद व कार्यकाळ-
१९९९-२००३- अर्थमंत्री, नियोजन विभाग मंत्री
२००३-२००४- अर्थमंत्री
२००४-२००८- अर्थमंत्री, विशेष सहाय्य विभाग मंत्री, विशेष मागासवर्गीय कल्याण विभाग मंत्री
२००८-२००९- गृहमंत्री
२००९-२०१०- ग्रामविकासमंत्री,पर्यावरण आणि हवामान बदल विभाग मंत्री, राज्य सीमा संरक्षण मंत्रालय
२०१०-२०१४- ग्रामविकासमंत्री, कामगारमंत्री, बंदर विकास विभाग
२०१९-२०२१- अर्थमंत्री, जलंसपदामंत्री
श्री. जयंत पाटील यांची विशेष उल्लेखनीय कामगिरी-
-
'संतुलित आणि समृद्ध ग्राम' या प्रकल्पातर्फे तत्कालीन मंत्री श्री. जयंत पाटील साहेबांतर्फे ‘इको व्हिलेज’ हा उपक्रम राज्यभर राबवण्यात आला. नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन आणि पोषण व्हावे यासाठी गावागावांमध्ये १५ कोटी झाडे लावण्यात आली.
-
२००८ साली मुंबईवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर नवनियुक्त गृहमंत्री श्री. जयंत पाटील यांनी आधुनिक प्रशिक्षण, शस्त्रे आणि उपकरणांसह दहशतवाद्यांच्या हल्ल्यांचे आव्हान स्वीकारण्यासाठी राज्यांचे स्वतःचे कमांडो फोर्स, ‘द फोर्स वन’ ची स्थापना केली.
-
श्री. जयंत पाटील यांच्या दूरदृष्टीतून डिजीटल शाळा उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा इंटरनेट कक्षांनी जोडून सर्व वर्ग हे डिजीटलाईज करण्यात आले.
-
जलसंपदा मंत्री असतानाच्या काळात श्री. जयंत पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या कामांसाठी आणि कालव्यांच्या कामासाठी तब्बल ९०० कोटी रुपये देऊन अहमदनगर जिल्ह्याला सुजलाम सुफलाम केलं.
-
मराठवाड्याला हक्काचे ६४ टीएमसी पाणी देऊन कोरडवाहू जमिनीवर हिरवळ निर्माण करण्यास तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलं.
-
सांगली जिल्ह्यातील वाकुडे उपसा सिंचन योजनेस व्दितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचं काम श्री. जयंत पाटील यांनी केली.
-
श्री. जयंत पाटील यांनी जलसंपदा विभागामार्फत कृष्णा खोरे विकास महामंडळास बिगर सिंचन तरतूदीतील विनावापर ६ टीएमसी पाणी जत तालुक्याला देण्याचे निर्णय घेतला. गेली अनेक वर्षे जत तालुक्याची ओळख सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून आहे. या जत तालुक्यातील ६५ गावे पाण्यापासून पूर्णपणे वंचित होती. या गावांना कायमस्वरूपी सिंचनाखाली आणण्यासाठी पाण्याची आवश्यकता होती. ही आवश्यकता श्री. जयंत पाटील यांनी पूर्ण केली.
-
जलसंपदा विभागाचा मंत्री म्हणून विविध प्रकल्पांची ३८५८ कोटींची कामे सांगली जिल्ह्यासाठी प्रस्तावित केलेली आहे.
-
म्हैसाळ टेंभू व ताकार या उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील उर्वरित वंचित गावांना पाणी देण्याचा निर्णय.
-
कार्यालयीन पत्ता व संपर्क क्रमांक
राष्ट्रवादी भवन, ठाकरसी हाऊस, जे. एन. हेरेडिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई ४०००३८.
संपर्क साधा : 022–35347400, 022–35347401