top of page
MAKE A DONATION
NCP-SP

सरकारकडून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम1500 रुपयात काय येणार? लाडकी बहीण योजनेवरुन सरकरला सुनावलं! - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे

Updated: Sep 11, 2024

पुणे  दि. ५ जुलै


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हापासून महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली आहे तेव्हापासून राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. ही जबाबदारी स्वीकारण्यात देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. गुन्हे फक्त मोठ्या शहरांमध्ये वाढले नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्रात वाढले आहेत. हा माझा डेटा नाही, तो केंद्र सरकारचा डेटा आहे. देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी गृहमंत्री आहे. असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.



सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजना मी स्वत:माहिती घेतली. १५०० रुपयांत किती रेशन येते याचा मी अभ्यास केला. या योजनेचं मी स्वागत करते. परंतु १५०० रुपयांत आमच्या महिला भगिनींना खरेच किती दिलासा मिळणार आहे? याचाही विचार केला पाहिजे. महागाई, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी आहे. १५०० रुपयांत कधी तुम्ही विचार केलाय का डाळ किती रुपयाला आहे?, कुणीतरी माझ्यासोबत किराणा मालाच्या दुकानात चला, महिनाभराचं सामान, भाजी खरेदीसाठी हे पुरण्यासारखं आहे का याचे उत्तर द्यावे असा टोला त्यांनी सरकारला लगावला. 



सुप्रियाताई सुळे पुढे म्हणाल्या की, तसेच महाराष्ट्रातही कृषी विभागात भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. ११८ कोटी भ्रष्टाचाराचा आरोप आहे. आरएसएसच्या माध्यमातून ही माहिती पुढे आली. या भ्रष्टाचाराचा पाठपुरावा त्यांनी केला. देवेंद्र फडणवीसांना ते भेटले परंतु त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे संसदेत बजरंग सोनवणे त्यावर बोलणार होते. महाराष्ट्राला या गोष्टीचं उत्तर मिळालं पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचं पाप या देशात आजच्या सरकारने केले आहे असा आरोप खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केला. 



सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, दरम्यान, कोविडमध्ये स्वत:चे फोटो लावण्याचं या लोकांनी सोडलं नाही. त्यामुळे कुठेही जाहिरातीवर फोटो लावतील. कधी ट्रिपल इंजिन सरकार, कधी डबल इंजिन सरकार बोललं जातं. नेमकी किती इंजिन हे कळत नाही. कारण त्यांचा प्रत्येक पक्ष प्रवक्ता विविध नंबर सांगतो. कुणाचे फोटो लावून कोण काय क्रेडिट घेतो हे महायुतीच्या बॅनरवॉरमधून दिसते असा चिमटाही सुप्रियाताई सुळेंनी काढला आहे. 



सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, महिलांच्या बाबतीत सातत्याने पातळीसोडून प्रतिक्रिया सत्तेतील महायुतीतील नेत्यांच्या येतात. ते महिलांचा विरोध आणि द्वेष करतात. महिला पुढे आलेल्या त्यांना सहन होत नाही. त्यामुळे सतत महिलांविरोधात जी विधाने येतात त्यात सातत्य आहे. त्यात हे त्यांच्या वैचारिक बैठकीत फरक नाही. असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.



यावर सविस्तर बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, आचारसंहितेमुळे कुठलाच निधी मिळाला नाही. निकाल लागून २ आठवडे झाले, त्यात संसदेचं अधिवेशन आहे. बारामतीतल्या रस्त्यासाठी मी नितीन गडकरींची भेट घेतली. अनेक विषयांवर मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या. महाराष्ट्रातील शेती, रस्ते आणि रेल्वे प्रश्नावर मविआचे खासदार मंत्र्यांना भेटले. महाराष्ट्रातले प्रश्न लवकरात लवकर सुटावे यासाठी प्रयत्न आहेत. असे सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले आहे.



सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, नीट ( NEET ) पेपर फुटीवर आम्हाला सविस्तर चर्चा हवी होती. देशातील कुठल्याही स्पर्धात्मक परिक्षेत आज प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. पुढच्या पिढीसाठी नोकऱ्या नाहीत. स्पर्धात्मक परिक्षेतून मेरिटवर कुणाला घेतले जाणार नाही. त्यामुळे नीटवर सविस्तर चर्चा व्हावी अशी मागणी होती. सरकारकडून देशाला उत्तर मिळालं नाही. राजकारण बाजूला ठेवून नीटसारख्या गंभीर आणि संवेदनशील विषयावर चर्चा व्हायला हवी होती परंतु ती झाली नाही. असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या. 



सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, आम्ही सध्या पुण्यात आहोत - पुणे पोर्श प्रकरणाचे काय झाले? पोर्शे हिट-अँड-रन प्रकरणात,  रक्ताच्या नमुने बदल महाराष्ट्रात असे कधीही घडलेलं कधी ऐकले आहे का?. ललित पाटील प्रकरणाचे काय झाले? गेल्या आठवड्यात केवळ धंगेकर यांच्यामुळे काही कारवाई झाली आहे. तीही विधानसभेचे अधिवेशन सुरू असल्यामुळेच. गेल्या वर्षभरात गृहमंत्रालय फेल ठरले हे दुर्दैव आहे. असे सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.


2 views0 comments

Comments


bottom of page