नवी दिल्ली दि. ८ जुलै
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे इतर पक्षांप्रमाणे कलम २९ ब नुसार देणगी स्वीकारता यावी याकरिता मागणी केली होती. या अर्जावर आज दिल्लीमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला कलम २९ ब नुसार पक्षाला देणगी स्वीकारण्यासंदर्भात निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी प्रसारमाध्यमांची बोलताना दिली आहे.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, आज आमच्या चार वेगवेगळ्या महत्त्वाच्या सुनावण्या दिल्लीमध्ये होत्या. शरद पवार साहेबांचा पक्ष ज्या पद्धतीने काढून घेतला ते पाहता जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले. त्याबद्दल जनतेचे आभार मानते. राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी पक्षाला निधी उभारण्यासाठी निवडणूक आयोगाकडे लोकप्रतिनिधी कायदा १९५१ अंतर्गत एक वेगळा राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्याची विनंती केली होती. यावर आज निवडणूक आयोगाकडे सुनावणी झाली. या निर्णयानंतर आता पक्षाला कलम २९ बी नुसार देणगी स्वीकारण्याकरता परवानगी मिळाली आहे. पण आम्हाला देणगी स्वरुपात रक्कम घेण्याचा अधिकार दिलेला नव्हता तसेच कर लाभ देखील मिळत नव्हते. आता आमची विनंती निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. असेही सुप्रियाताई सुळे यांनी म्हटले आहे.
पुढे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, चेक स्वीकारण्याचाही अधिकार आम्हाला नव्हता. कोणताही कर सवलत आम्हाला मिळत नव्हती. मात्र आता आमची विनंती स्वीकारली गेली आहे. चिन्हात जो गोंधळ निर्माण झाला होता त्याबद्दल दुसरी मागणी होती. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह जिथं असेल तिथं तुतारी चिन्ह नको. हा अन्याय अन्य पक्षांवरही होऊ नये अशी विनंती निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. यावर आयोगाने आम्ही अभ्यास करु असे उत्तर दिल्याचे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, आम्ही निवडणूक आयोगाकडे दुसरी एक विनंती केली. यामध्ये तुतारी चिन्हावरून होणाऱ्या संभ्रमावस्थेबद्दल होती. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी दुसरी तुतारी देण्यात येऊ नये, अशी विनंती केली. असा अन्याय इतर कोणत्याही पक्षावर होऊ नये, असेही सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
Comments