मुंबई- दि. २५ जून
राज्य सरकारमधील मंत्री तथा सरकारमधील नेत्यांच्या वतीने मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा विषय ज्याप्रमाणे हाताळत आहे. या संदर्भातील सरकारची भुमिका संशयास्पद आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
राज राजापूरकर म्हणाले की, राज्यात एकीकडे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन सुरू होते. त्यांनतर आता ओबीसीतून आरक्षण मिळू नये म्हणून आंदोलन केले जात आहे. हे आदोलन सांभाळताना सत्तेतील लोक समाजात तेढ निर्ज्ञाण करण्याचा प्रयत्न करत आहे. यात सरकारची भुमिका महत्वाची आहे. सरकारने नोंदी शोधल्या, प्रमाणपत्र दिले. पण मला यात संशय येतो आहे. असे राज राजापूरकर म्हणाले.
राज राजापूरकर म्हणाले की, ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी सरकारची भुमिका संशयास्पद आहे. कारण ते जातनिहाय जनगणना करत नाही. जातनिहाय जनगणना संदर्भात आम्ही वारंवार भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र सरकारच्या वतीने जातनिहाय जनगणना करण्यावर सरकारकडून कुठलीही भूमिका स्पष्ट करण्यात येत नाही आहे. आम्ही जातनिहाय जनगणना व्हावी म्हणून आंदोलन करणार आहोत. असेही राज राजापूरकर यांनी म्हटले आहे.
पुढे राज राजापूरकर म्हणाले की, जातीनिहाय जनगणनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आम्ही राज्यात ठीक ठिकाणी आंदोलन करणार आहे. तसेच अधिवेशना दरम्यान राज्य सरकारला विधानसभेवर जाऊन घेरावा देखील घालण्यात येईल. ओबीसी आमचा डीएनए आहे असे म्हणणाऱ्या फडणवीस यांच्या वक्तव्याचा ओबीसी सेलच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो. कारण जेंव्हा ओबीसी आरक्षणाविषयी भुमिका घेण्याचा मुद्दा येतो तेंव्हा ते बोलत नाहीत. आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीस नेहमीच वेळेनुसार वेगवेगळे वक्तव्य करत असतात. ओबीसी सेलच्या वतीने आम्ही देवेंद्र फडणवीस यांना अधिवेशनादरम्यान घेरावा घालणार आहे असे राज राजापूरकर यांनी सांगितले आहे.
Comments