मा. आ. जितेंद्र आव्हाड
समुदायांना प्रगतीशील बनवण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन देण्यासाठी
जितेंद्र आव्हाड: महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील राजकीय वातावरणाचे विश्लेषण करणारी व्यक्ती
माजी मंत्री मा. आ. जितेंद्र आव्हाड
विधानसभा सदस्य
जिल्हा- ठाणे
मतदारसंघ- मुंब्रा कळवा
अनुभव- २० वर्ष
विजयी कारकीर्द- ४
श्री. जितेंद्र आव्हाड यांनी कळवा-मुंब्रा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून २००९ पासून विधानसभेवर विजयाचा झेंडा रोवला आहे. महाराष्ट्रातील पुरोगामी राजकीय विचारवंत म्हणून आपली ओळख डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी प्रस्थापित केली आहे. आघाडी सरकारमध्ये मा. आव्हाड यांनी गृहनिर्माण पदाची जबाबदारी पार पाडत आहेत.
त्यांचा राजकीय प्रवास १९९९-२००६ राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदावरुन सुरू झाला. पुढे २००६ साली पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पदावर ते कार्यरत होते. २००२-२००८ विधान परिषद सदस्य पदावर नियुक्ती, राष्ट्रवादी प्रदेश कार्याध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. २०१४ साली वैद्यकीय शिक्षण आणि फलोत्पादन विभाग मंत्री अशा विविध पदांवर आव्हाड यांनी उत्तम काम केले.
विधानसभा सदस्य:
२००९
२०१४
२०१९
मंत्रिमंडळातील पद व कार्यकाळ:
२०१४- वैद्यकीय शिक्षण, फलोत्पादन, रोजगार हमी राज्यमंत्री
२०१९-२०२२- गृहनिर्माण,अल्पसंख्याक विकास व औकाफ विभाग
श्री. जितेंद्र आव्हाड यांची विशेष उल्लेखनीय कामगिरी:
-
सिध्दार्थनगर गोरेगाव पत्राचाळीचा पुनर्विकास सिध्दार्थनगर येथील १३.८ एकर जागेत वसलेल्या चाळीचे पुनर्विकास करण्यात येणार आहे. मोतीलाल नगर येथील गोरेगाव वसाहतीचा पुनर्विकास करण्यात येणार असून याअंतर्गत १४२ एकरमधील ३७०० गाळे व १६०० झोपड्यांचा पुनर्विकास होणार आहे.
-
मुला व मुलींचे वसतिगृह राज्याच्या विविध भागातून मुंबई शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या मुलामुलींची राहण्याची सोय या ठिकाणी होणार आहे. जिजामाता नगर, काळाचौकी, परेल, शिवडी येथील संक्रमण शिबिराच्या जागेवर वसतिगृह उभारण्यात येणार आहे. तळमजला + १८ मजल्यांची इमारत अशा स्वरुपाचे हे वसतिगृह असणार आहे. ३७५ मुलामुलींची निवासाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार असून ५४.३० कोटी खर्च करण्यात येणार आहे.
-
नोकरदार महिलांकरिता वसतिगृह ताडदेव येथील एम.पी. मिल कंम्पाऊंड येथे ३२ कोटी रुपये खर्चुन तळ + ३ वाहनतळ + १५ मजल्यांचे प्रस्तावित इमारत उभारण्यात येणार आहे. जिम, योगा रूम, ग्रंथालय, स्वतंत्र स्वयंपाकगृह सोय या ठिकाणी असणार आहे.
-
कॅन्सरग्रस्त रुग्णांना व नातेवाईकांची राहण्याची सोय टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईंकांना उपचार कालावधीत राहण्यासाठी सोय करण्यात आली आहे. या अनुषंगाने टाटा रुग्णालयाला २२५ चौ.फु.च्या १०० सदनिका बॉम्बे डाईंग मिलमधील इमारतीमध्ये देण्यात आल्या आहेत. या सदनिकांच्या वाटपाची व देखभाल व व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबादारी टाटा रुग्णालयाची असणार आहे.
-
मुंबईतील कोळीवाड्यांचा विकास मुंबईतील कोळीवाडे हे मुंबईचा अविभाज्य भाग असल्याने त्यांच्या पुनर्विकासासाठी डीसीपीआरमध्ये विशेष तरतूद करण्याचे प्रस्तावित आहे. या कोळीवाड्यांचे सिमांकन पूर्ण झाल्यानंतर त्या भागासाठी एसआरए लागू होणार नाही.
-
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुंबई क्षेत्र वगळून एम. एम.आर., एस.आर.ए.ची स्थापना यामुळे ठाणे, नवी मुंबई. मिरा-भाईंदर, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, पनवेल या आठ महानगरपालिका व अंबरनाथ, बदलापूर, इत्यादी एम.एम.आर. मधील नगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करणार. एस.आर.ए. योजनांमध्ये सार्वजनिक आरोग्य केंद्राचा समावेश करण्यात आला आहे.
कार्यालयीन पत्ता व संपर्क क्रमांक:
Contact No. 9930000001
Email : jitendra.awhad@yahoo.com