top of page
Add a heading (72).png
Untitled design (3) (1).jpg

मा. आ. जयंत पाटील

(महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष)

समुदायांना सक्षम करणे,
उद्देशाने अग्रगण्य

Jayant Patil

जयंत पाटील, विकास आणि न्यायासाठीच्या आमच्या वचनबद्धतेमध्ये माझ्यासोबत या. आमच्याशी संपर्क साधा आणि या महत्त्वपूर्ण चळवळीचा भाग व्हा.

  • Instagram
  • Facebook
  • X
  • Youtube

जयंत राजाराम पाटील: महाराष्ट्राच्या राजकारणातील गतिमान नेत्याचा प्रवास

मा.  श्री. जयंत राजाराम पाटील
विधानसभा सदस्य.

प्रदेशाध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार

जिल्हा- सांगली

मतदारसंघ- इस्लामपूर

अनुभव- ३२ वर्ष

विजयी कारकीर्द- ७

इस्लामपूर तालुक्यातील साखराळे हे जयंत पाटील यांचे गाव. त्यांचा जन्म १६ फेब्रुवारी १९६२ रोजी झाला. स्वर्गीय राजारामबापू पाटील यांचे चिरंजीव असलेल्या जयंत पाटील यांना घरातूनच राजकारणाचं बाळकडू मिळालं. राजारामबापू काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. वडिलांकडूनच राजकारणाचे धडे त्यांना मिळाले. सलग ९ वेळा अर्थसंकल्प मांडणारे मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री म्हणून जयंत पाटील यांनी कामगिरी बजावली आहे.  पाटील यांनी राज्याच्या मंत्रीमंडळात सलग पंधरा वर्षे अर्थ, गृह व ग्रामविकासमंत्री म्हणून प्रभावी काम करतानाच लोकांचे विविध प्रश्न सोडविण्यास मोठे सहकार्य केले.

श्री. जयंत पाटील यांची ओळख ही राजकीय क्षेत्रातील सुविद्य व सुसंस्कृत व्यक्तिमत्व अशी आहे. अत्यंत तळगाळातील परिस्थितीची जाम ठेवून त्यादृष्टीकोनातून अथकपणे काम करणारे नेतृत्व म्हणून त्यांचा लौकिक आहे. महाराष्ट्राच्या अर्थकारणाचे व समाजकारणाचे बारकावे जाणणारे अभ्यासू नेते म्हणून ते परिचित आहेत. सहकार महर्षी राजारामबापू पाटील यांचा समाजकारण व राजकारणाचा वारसा पुढे चालवत अतिशय यशस्वीपणे सहकारी साखर कारखाना, दूध संघ, शिक्षण संस्था, टेक्सटाईल पार्क यांची उभारणी श्री. जयंच पाटील यांच्यामार्फत करण्यात आली. सलग सात वेळा वाळवा मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी झाले आहेत. आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर सलग नऊवेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याचा इतिहास श्री. जयंत पाटील यांच्या नावावर लिहिला गेला आहे. श्री. जयंत पाटील  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा उत्तमरीत्या सांभाळत आहेत.

विधानसभा सदस्य-
१९९०
१९९५
१९९९
२००४ 
२००९ 
२०१४
२०१९

मंत्रिमंडळातील पद व कार्यकाळ-

१९९९-२००३- अर्थमंत्री, नियोजन विभाग मंत्री
२००३-२००४- अर्थमंत्री
२००४-२००८- अर्थमंत्री, विशेष सहाय्य विभाग मंत्री, विशेष मागासवर्गीय कल्याण विभाग मंत्री
२००८-२००९- गृहमंत्री
२००९-२०१०- ग्रामविकासमंत्री,पर्यावरण आणि हवामान बदल विभाग मंत्री, राज्य सीमा संरक्षण मंत्रालय
२०१०-२०१४- ग्रामविकासमंत्री, कामगारमंत्री, बंदर विकास विभाग
२०१९-२०२१- अर्थमंत्री, जलंसपदामंत्री
 
श्री. जयंत पाटील यांची विशेष उल्लेखनीय कामगिरी-
 
  • 'संतुलित आणि समृद्ध ग्राम' या प्रकल्पातर्फे तत्कालीन मंत्री श्री. जयंत पाटील साहेबांतर्फे ‘इको व्हिलेज’ हा उपक्रम राज्यभर राबवण्यात आला. नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन आणि पोषण व्हावे यासाठी गावागावांमध्ये १५ कोटी झाडे लावण्यात आली.

  • २००८ साली मुंबईवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर नवनियुक्त गृहमंत्री श्री. जयंत पाटील यांनी आधुनिक प्रशिक्षण, शस्त्रे आणि उपकरणांसह दहशतवाद्यांच्या हल्ल्यांचे आव्हान स्वीकारण्यासाठी राज्यांचे स्वतःचे कमांडो फोर्स, ‘द फोर्स वन’ ची स्थापना केली.
     
  • श्री. जयंत पाटील यांच्या दूरदृष्टीतून डिजीटल शाळा उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा इंटरनेट कक्षांनी जोडून सर्व वर्ग हे डिजीटलाईज करण्यात आले.

  • जलसंपदा मंत्री असतानाच्या काळात श्री. जयंत पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या कामांसाठी आणि कालव्यांच्या कामासाठी तब्बल ९०० कोटी रुपये देऊन अहमदनगर जिल्ह्याला सुजलाम सुफलाम केलं.

  • मराठवाड्याला हक्काचे ६४ टीएमसी पाणी देऊन कोरडवाहू जमिनीवर हिरवळ निर्माण करण्यास तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलं. 

  • सांगली जिल्ह्यातील वाकुडे उपसा सिंचन योजनेस व्दितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचं काम श्री. जयंत पाटील यांनी केली.

  • श्री. जयंत पाटील यांनी जलसंपदा विभागामार्फत कृष्णा खोरे विकास महामंडळास बिगर सिंचन तरतूदीतील विनावापर ६ टीएमसी पाणी जत तालुक्याला देण्याचे निर्णय घेतला. गेली अनेक वर्षे जत तालुक्याची ओळख सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून आहे. या जत तालुक्यातील ६५ गावे पाण्यापासून पूर्णपणे वंचित होती. या गावांना कायमस्वरूपी सिंचनाखाली आणण्यासाठी पाण्याची आवश्यकता होती. ही आवश्यकता श्री. जयंत पाटील यांनी पूर्ण केली.
     
  • जलसंपदा विभागाचा मंत्री म्हणून विविध प्रकल्पांची ३८५८ कोटींची कामे सांगली जिल्ह्यासाठी प्रस्तावित केलेली आहे. 

  • म्हैसाळ टेंभू व ताकार या उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील उर्वरित वंचित गावांना पाणी देण्याचा निर्णय.

  • कार्यालयीन पत्ता व संपर्क क्रमांक 

       राष्ट्रवादी भवन, ठाकरसी हाऊस, जे. एन. हेरेडिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई ४०००३८. 

       संपर्क साधा : 022–35347400, 022–35347401

jap8.jpg

Political Journey

1999-2003

अर्थमंत्री, विशेष सहाय्य विभाग मंत्री,

2004 ते 2008 या काळात महाराष्ट्रात अर्थमंत्रीपद भूषवले.

अर्थमंत्री, महाराष्ट्र

2003-2004 पर्यंत महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून काम केले

2003-2004

2004-2008

अर्थमंत्री, विशेष सहाय्य विभाग मंत्री,

2004 ते 2008 या काळात महाराष्ट्रात अर्थमंत्रीपद भूषवले.

गृहमंत्री

2008 ते 2009 या काळात महाराष्ट्रात गृहमंत्री म्हणून काम केले.

2008-2009

2009-2010

ग्रामविकास मंत्री 

ग्रामीण विकास आणि राज्य सीमा संरक्षण मंत्री म्हणून भूमिका स्वीकारली.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री

2009 ते 2014 या काळात महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून काम केले.

2009 - 2014

1990, 1995, 1999, 2004, 2009,2014,2019

ग्रामविकास मंत्री, कामगार मंत्री

1990, 1995, 1999, 2004, 2009, 2014, 2019 मध्ये विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले.

अर्थमंत्री, जलसंपदा मंत्री

2019 ते 2021 पर्यंत महाराष्ट्राचे अर्थमंत्री, जलसंपदा मंत्री म्हणून काम केले.

2019-2021

गॅलरी

!
bottom of page