मा. खा. डाॅ. अमोल कोल्हे
प्रगतीसाठी एकत्र येणे,
दूरदृष्टीने नेतृत्व करणे
डॉ. अमोल कोल्हे: एक दूरदर्शी आणि महाराष्ट्राच्या राजकीय परिदृश्यातील लोकांसाठी नेता
संसदरत्न डाॅ. अमोल रामसिंह कोल्हे
लोकसभा सदस्य
जिल्हा- पुणे
मतदारसंघ- शिरूर लोकसभा
अनुभव- 5 वर्ष
विजयी कारकीर्द- 2
डॉ. अमोल कोल्हे यांचा जन्म पुण्याजवळील नारायणगाव येथे झाला. आठवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी तेथेच घेतले आणि मग पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. आपटे प्रशालेतून विज्ञान शाखेमधून त्यांनी १२वीपर्यंतचे शिक्षण घेतले. सेठ गोवर्धनदास सुंदरदास (जी.एस.) महाविद्यालयातून डाॅ. अमोल कोल्हे यांनी एमबीबीएसचे आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.
डॉ. अमोल कोल्हे आधीपासूनच छत्रपती संभाजी महाराजांना आदर्श मानतात. डाॅ. अमोल कोल्हे यांनी मार्च २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि खासदार पदी त्यांची निवड झाली. २०२४ ला पुन्हा त्यांनी शिरूर लोकसभा निवडणूक लढवली व ते विजयी झाले.
टाईमलाईन
२०१९ : १ मार्च२०१९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
२०१९ : २३ मे२०१९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर शिरूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले.
पत्ता: वसुंधरा कमर्शीयल काॅम्प्लेक्स, कार्यालय क्रमांक १०, कोल्हे मळा, पोस्ट आॅफीस नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे- ४१०५०४
संपर्क क्रमांक- ९९७५५९३७०५
ई-मेल- contact@amolrkolhe.com
मा. श्री. जयंत राजाराम पाटील
विधानसभा सदस्य.
प्रदेशाध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार
जिल्हा- सांगली
मतदारसंघ- इस्लामपूर
अनुभव- ३२ वर्ष
विजयी कारकीर्द- ७
इस्लामपूर तालुक्यातील साखराळे हे जयंत पाटील यांचे गाव. त्यांचा जन्म १६ फेब्रुवारी १९६२ रोजी झाला. स्वर्गीय राजारामबापू पाटील यांचे चिरंजीव असलेल्या जयंत पाटील यांना घरातूनच राजकारणाचं बाळकडू मिळालं. राजारामबापू काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. वडिलांकडूनच राजकारणाचे धडे त्यांना मिळाले. सलग ९ वेळा अर्थसंकल्प मांडणारे मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री म्हणून जयंत पाटील यांनी कामगिरी बजावली आहे. पाटील यांनी राज्याच्या मंत्रीमंडळात सलग पंधरा वर्षे अर्थ, गृह व ग्रामविकासमंत्री म्हणून प्रभावी काम करतानाच लोकांचे विविध प्रश्न सोडविण्यास मोठे सहकार्य केले.
श्री. जयंत पाटील यांची ओळख ही राजकीय क्षेत्रातील सुविद्य व सुसंस्कृत व्यक्तिमत्व अशी आहे. अत्यंत तळगाळातील परिस्थितीची जाम ठेवून त्यादृष्टीकोनातून अथकपणे काम करणारे नेतृत्व म्हणून त्यांचा लौकिक आहे. महाराष्ट्राच्या अर्थकारणाचे व समाजकारणाचे बारकावे जाणणारे अभ्यासू नेते म्हणून ते परिचित आहेत. सहकार महर्षी राजारामबापू पाटील यांचा समाजकारण व राजकारणाचा वारसा पुढे चालवत अतिशय यशस्वीपणे सहकारी साखर कारखाना, दूध संघ, शिक्षण संस्था, टेक्सटाईल पार्क यांची उभारणी श्री. जयंच पाटील यांच्यामार्फत करण्यात आली. सलग सात वेळा वाळवा मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी झाले आहेत. आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर सलग नऊवेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याचा इतिहास श्री. जयंत पाटील यांच्या नावावर लिहिला गेला आहे. श्री. जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा उत्तमरीत्या सांभाळत आहेत.
विधानसभा सदस्य-
१९९०
१९९५
१९९९
२००४
२००९
२०१४
२०१९
मंत्रिमंडळातील पद व कार्यकाळ-
१९९९-२००३- अर्थमंत्री, नियोजन विभाग मंत्री
२००३-२००४- अर्थमंत्री
२००४-२००८- अर्थमंत्री, विशेष सहाय्य विभाग मंत्री, विशेष मागासवर्गीय कल्याण विभाग मंत्री
२००८-२००९- गृहमंत्री
२००९-२०१०- ग्रामविकासमंत्री,पर्यावरण आणि हवामान बदल विभाग मंत्री, राज्य सीमा संरक्षण मंत्रालय
२०१०-२०१४- ग्रामविकासमंत्री, कामगारमंत्री, बंदर विकास विभाग
२०१९-२०२१- अर्थमंत्री, जलंसपदामंत्री
श्री. जयंत पाटील यांची विशेष उल्लेखनीय कामगिरी-
-
'संतुलित आणि समृद्ध ग्राम' या प्रकल्पातर्फे तत्कालीन मंत्री श्री. जयंत पाटील साहेबांतर्फे ‘इको व्हिलेज’ हा उपक्रम राज्यभर राबवण्यात आला. नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन आणि पोषण व्हावे यासाठी गावागावांमध्ये १५ कोटी झाडे लावण्यात आली.
-
२००८ साली मुंबईवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर नवनियुक्त गृहमंत्री श्री. जयंत पाटील यांनी आधुनिक प्रशिक्षण, शस्त्रे आणि उपकरणांसह दहशतवाद्यांच्या हल्ल्यांचे आव्हान स्वीकारण्यासाठी राज्यांचे स्वतःचे कमांडो फोर्स, ‘द फोर्स वन’ ची स्थापना केली.
-
श्री. जयंत पाटील यांच्या दूरदृष्टीतून डिजीटल शाळा उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा इंटरनेट कक्षांनी जोडून सर्व वर्ग हे डिजीटलाईज करण्यात आले.
-
जलसंपदा मंत्री असतानाच्या काळात श्री. जयंत पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या कामांसाठी आणि कालव्यांच्या कामासाठी तब्बल ९०० कोटी रुपये देऊन अहमदनगर जिल्ह्याला सुजलाम सुफलाम केलं.
-
मराठवाड्याला हक्काचे ६४ टीएमसी पाणी देऊन कोरडवाहू जमिनीवर हिरवळ निर्माण करण्यास तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलं.
-
सांगली जिल्ह्यातील वाकुडे उपसा सिंचन योजनेस व्दितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचं काम श्री. जयंत पाटील यांनी केली.
-
श्री. जयंत पाटील यांनी जलसंपदा विभागामार्फत कृष्णा खोरे विकास महामंडळास बिगर सिंचन तरतूदीतील विनावापर ६ टीएमसी पाणी जत तालुक्याला देण्याचे निर्णय घेतला. गेली अनेक वर्षे जत तालुक्याची ओळख सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून आहे. या जत तालुक्यातील ६५ गावे पाण्यापासून पूर्णपणे वंचित होती. या गावांना कायमस्वरूपी सिंचनाखाली आणण्यासाठी पाण्याची आवश्यकता होती. ही आवश्यकता श्री. जयंत पाटील यांनी पूर्ण केली.
-
जलसंपदा विभागाचा मंत्री म्हणून विविध प्रकल्पांची ३८५८ कोटींची कामे सांगली जिल्ह्यासाठी प्रस्तावित केलेली आहे.
-
म्हैसाळ टेंभू व ताकार या उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील उर्वरित वंचित गावांना पाणी देण्याचा निर्णय.
-
कार्यालयीन पत्ता व संपर्क क्रमांक
राष्ट्रवादी भवन, ठाकरसी हाऊस, जे. एन. हेरेडिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई ४०००३८.
संपर्क साधा : 022–35347400, 022–35347401