सर्वसमावेशक विकासासाठी
चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा असोत की, आयटी पार्क आणि MIDC च्या उभारणीतून सुरु झालेली रोजगाराची वाहती गंगा, माता भगिनींच्या कल्याणासाठी घेण्यात आलेले दूरगामी निर्णय असोत की, बळीराजाच्या उत्कर्षासाठी घेण्यात आलेले निर्णय. समाजघटकातील प्रत्येकाचा विचार करून लोकसेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचं काम ‘राष्ट्रवादी काँगेस पक्ष-शरदचंद्र पवार’ पक्ष अविरतपणे करत आहे.
नेतृत्वाची फळी
प्रदेश फ्रंटल संघटना
पक्षाने घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय
आमची प्रेरणा
सत्याचा असत्यावर, न्यायाचा अन्यायावर, सुशासनाचा बेबंदशाहीवर अधिकृत अंमल करणारा आणि अठरा पगड जातीतील आपल्या बांधवांना सोबत घेऊन स्वराज्याचं स्वप्न साकार करणारा या भूतलावरील महान योध्दा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज… संत परंपरेची- वारकऱ्यांची, थोर विचारवंताची दैदिप्यमान परंपरा लाभली तो हा महाराष्ट्र
दिल्लीच्या तख्तापुढे न झुकता अखंड भारतात जाज्वल्य मराठा साम्राज्याची पताका ज्यांनी मिरवली, रयतेच्या मनातील हिंदवी स्वराज्य ज्याने निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज होय. स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेऊन भारतात मुलींची पहिली शाळा सुरु केली ती महात्मा ज्योतिबा फुलेंनी… समता आणि समानतेचा प्रचार व प्रसार केला तो छत्रपती शाहू महाराजांनी, देशाला लोकशाही आधारीत संविधान दिले ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी. देशाला दिशा देणा-या छत्रपती-फुले-शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा हा वारसा पुढे नेण्याचं काम या महाराष्ट्राने केलं.
स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ,पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले,माता रमाबाई आंबेडकर या महान स्त्रीयांचा वारसा या महाराष्ट्राला लाभला ही आपल्या प्रत्येकासाठी अभिमानास्पद बाब आहे.
१८ पगड जाती, १२ बलुतेदार या सगळ्यांना एकाच छताखाली सामावून घेत एकजुटीने महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचा उध्दार करण्याचं व्रत छत्रपती शिवरायांपासून पुरोगामी विचारांच्या अनेक आदर्शवत लोकप्रतिनिधींनी आजवरच्या राजकीय व्यवस्थेत जोपासलंय. यापैकीच एक नाव म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री वंदनीय स्व. यशवंतराव चव्हाण. चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा जपण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष अविरतपणे करत आहे.
पक्षात सामील व्हा!
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ पक्षाशी जोडला गेलेला प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाची एक अमुलाग्र ताकद आहे. शिवछत्रपती, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा पुरोगामी वारसा जपत जनसेवेसाठी कायम तत्पर राहण्याची शिकवण ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ पक्षाची आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. खा. शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली लोकसेवेच्या या मोहिमेत आपण सर्वांनी एकत्र यायलाच हवं आणि संघटनात्मक कौशल्यास चालना द्यायलाच हवी. खालील ‘सहभागी व्हा’ या बटणावर क्लिक करून तुमची संपूर्ण माहिती भरा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ पक्षाच्या या प्रवासात जोडले जा!
१० जून १९९९ रोजी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ पक्षाची स्थापना झाली तेव्हा दिल्लीतील राजकीय परिस्थिती चिंताजनक आणि प्रतिकूल होती. तरीही पवार साहेबांचा त्यांच्या व्हिजनवर आणि जनतेवर विश्वास होता. या नव्या पक्षाची राजकीय विचारधारा ही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी घालून दिलेल्या मार्गावर पवार साहेबांनी आपली पुरोगामी राजकीय व सामाजिक जाणीव अधोरेखित केली. पुरोगामी आणि लोकाभिमुख विचारधारा राष्ट्रवादीने कायम ठेवली आहे.
संविधानाचा आदर, लोकशाही मूल्यांचे रक्षण, उपेक्षित व वंचित जनतेसाठी सामाजिक न्यायाची बांधिलकी, बळीराजा आणि कामगारांच्या हिताचे सामाजिकीकरण. महिला सक्षमीकरण आणि बालकल्याण हा राष्ट्रवादीच्या विचारसरणीचा गाभा राहिला आहे. पुरोगामी, सर्वसमावेशक आणि सुसंस्कृत महाराष्ट्राची ओळख प्रस्थापित करण्यात ‘राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार’ पक्षाचा मोठा वाटा आहे. उद्योग, कृषी, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि नियोजित शहरीकरण या सात प्रमुख क्षेत्रांवर आधारित अजेंड्यावर पक्षाने काम सुरू ठेवले आहे.